
Mumbai Update : अग्निशमन दलाकडून मुंबईतील सुमारे 90 सोसायट्यांना गेल्या दोन आठवड्यात अग्निशमन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. शहरात आगीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने हे पाऊल उचलले आहे.(… So the societies in Mumbai may be cut off from electricity and water connections)
अग्निशमन दलाच्या वतीने अधिकाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले असून ते वॉर्ड स्तरावरील निवासी इमारतींना नियमित भेट देत आहेत. गेल्या काही महिन्यांत मुंबईत मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत आहेत. या कारणामुळे आता, MFB म्हणजेच अग्निशमन दल हे सुनिश्चित करत आहे, की सर्व निवासी मालमत्ता कठोर अग्निसुरक्षा नियमांचे पालन करत असतील व त्यांची अग्निशमन उपकरणे कार्यरत आहेत.
बर्याच उंच इमारतींमध्ये एकतर दोषपूर्ण अग्निशामक यंत्रणा किंवा पाण्याचे निकृष्ट पाईप्स आढळतात. अनेक वर्षांपासून अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याने अधिकाऱ्यांना त्याची चिंता होती.
महाराष्ट्र अग्निशमन दल कायद्यानुसार, प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला त्यांच्या अग्निशमन यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी जास्तीत जास्त 120 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र आता हे दिवस केवळ 30 दिवसांवर आले आहेत. या सोसायट्यांनी 30 दिवसांत दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहेत.
मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब म्हणाले की, जर सोसायटी निर्धारित वेळेत दुरुस्तीचे काम सुरू करू शकत नसेल तर त्यांना पूर्व माहिती द्यावी लागेल, अन्यथा त्या सोसायट्यांवर अधिकारी कारवाई करू शकतात.
तसेच परब म्हणाले की, इमारतींना भेट दिल्यानंतर आमचे अधिकारी अग्निशमन यंत्रणेची पाहणी करतात व त्यांना काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त चार महिन्यांचा कालावधी आहे. नोटीस दिल्यानंतर एक महिन्याच्या आत दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. व इमारतींमधील पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात येईल.
भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट म्हणाले, हा नियम नवीन नसून जुनाच आहे, परंतु आता त्याची आक्रमकपणे अंमलबजावणी केली जात आहे. आशा आहे की प्रक्रिया सुरळीत आणि नियमित होईल तसेच नंतर कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
हे ही वाचा :