खूप काही

Mumbai Updated : म्हणून दिवाळीनिमित्त कार व दुचाकी विक्रेत्यांना फटका;पहा काय आहे कारण…

वाहतूक आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मुंबईत धनत्रयोदशीच्या सणासाठी  कार व दुचाकीच्या विक्री कमी झाली आहे. 

Mumbai Updated :मुंबईसह देशभरात सध्या दिवाळी सण साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त घरात अनेक नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. तर धनत्रयोदशीला सोने किंवा नवीन गाडी खरेदी केली जाते. परंतु वाहतूक आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मुंबईत धनत्रयोदशीच्या सणासाठी  कार व दुचाकीच्या विक्री कमी झाली आहे.  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विक्रीत घट होण्याचे एक कारण म्हणजे इंधनाच्या दरात मोठ्याप्रमाणात झालेली वाढ.(So hit car and bike dealers on the occasion of Diwali; see what is because …)

गेल्या दीड वर्षात पेट्रोलचे दर 51 टक्‍क्‍यांनी तर डिझेलचे दर 60 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.  वेलॉक्स मोटर्सचे महाव्यवस्थापक (विक्री) सचिन गावडे म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने लोक आता CNG कारचा पर्याय निवडत आहेत.  याशिवाय, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे कार मोटर्सची उपलब्धतेत देखील उशीर होत आहे, ज्यामुळे विक्रीत घट झाली आहे.

एका डीलरने सांगितले की, गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर शोरूममध्ये गर्दी होती. कारण लोकांना दिवाळी 2020 मध्ये नवीन कार आणि दुचाकी खरेदी करायची होती.

धनत्रयोदशीच्या पंधरवड्यापूर्वीच्या वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार, शहरातील विविध शोरूममधून दिवाळी डिलिव्हरीसाठी 2,447 कार आणि 6237 बाइक्स बुक करण्यात आल्या होत्या, जे गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशी आणि दिवाळी विक्रीच्या तुलनेत कमी आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त मुंबईत कार व दुचाकीची ही सर्वात कमी विक्री आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments