आपलं शहरबीएमसी

Mumbai Water Supply : पाईपलाईन गळतीमुळे मुंबईतील या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद, केव्हा होईल सुरळीत…

या दुरुस्तीच्या कामामुळे 13 नोव्हेंबरलाही या भागांमध्ये कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे,

Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. मुंबईत 12 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत  वरळी, नेपियन सी रोड, भुलाभाई देसाई मार्ग, दादर, माहीम आणि प्रभादेवी या भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.(Water supply cut off in these parts of Mumbai due to pipeline leakage, when will it be smooth …)

माहितीनुसार, पवईमधील वैतरणा येथून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमुळे ती दुरूस्त करण्यात येणार आहे.  या कामामुळे मुंबईत अनेक भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद होता. पाईपलाईनच्या दुरुस्तीमुले 12 व 13 नोव्हेंबर रोजी मुंबईतील अनेक वॉर्डांपैकी जी दक्षिण, जी उत्तर, डी आणि ए विभागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम दिसून येईल.

BMC ने दिलेल्या माहितीनुसार,पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वरळी, मलबार हिल व पाली जलाशय तसेच माहीम येथील पाणीपुरवठा उद्यापर्यंत प्रभावित करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे 13 नोव्हेंबरलाही या भागांमध्ये कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे BMC ने मुंबईकरांना 12  नोव्हेंबर  ते 13 नोव्हेंबरपर्यंतपर्यंत आवश्यक पाणी जमा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments