आपलं शहर

Mumbai Weather : ऐन थंडीत मुंबईकर उकाड्याने हैराण, पारा 27 अंश सेल्सिअसच्या पार…

नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे तापमान 27 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे.

Mumbai Weather : थंडीचा मोसम सुरू झाला असला,तरी सध्या मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईतील वाढता पारा लोकांना घाम फोडत आहे.  दिवस असो वा रात्र, मुंबईकर उन्हाच्या तडाख्याने हैराण झाले आहेत. रविवारी मुंबईत किमान तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.(Mumbaikar Ukadyane harassed in cold weather, mercury crossed 27 degrees Celsius …)

नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे तापमान 27 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे.  आता नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

थंडीचा मोसम सुरू झाला असला, तरी  मुंबईला उकाडा व आर्द्रतेने वेढले असून  दरम्यान, पावसानेही दणका दिला आहे.  पावसामुळे तापमानात घट होईल, अशी अपेक्षा होती, मात्र पारा घसरण्याऐवजी आणखी वाढल्याचे पहायला मिळाले.  दिवसा व रात्रीच्या तापमानात असामान्य वाढ झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

रविवारी मुंबई उपनगरातील किमान तापमान 27 अंश सेल्सिअस तर शहराचे 25 अंश सेल्सिअसवर पोहोचले.  यापूर्वी 4 नोव्हेंबर 2018 रोजी किमान तापमान 27.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.  दिवसाचे तापमानही उकळत आहे.  रविवारी उपनगरात 35.4 अंश सेल्सिअस तर शहराचे 31.8 अंश सेल्सिअस तापमान होते.

डिसेंबरमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळेल

पुढील एक आठवडा देशाच्या उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होणार नाही, त्यामुळे तिथून येणारे थंड वारे आपल्यासोबत तितकीशी थंडी आणू शकणार नाहीत.  अशा स्थितीत मुंबईकरांना नोव्हेंबर अखेरपर्यंत उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.  डिसेंबरमध्येच काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments