खूप काही

NASA report : मुंबईसह देशातील 12 शहरे जाणार पाण्याखाली, NASA ने सादर केला अहवाल

समुद्रकिनारी वसलेली 12 शहरे पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

NASA report :मुंबईसह देशभरात कोरोनाचे संकट असतानाच आणखी एक संकट भारतातील शहरांवर येऊन ठेपले आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (NASA) ने प्रसिद्ध केलेल्या एका नवीन अहवालाने हे सिद्ध केले आहे की, वातावरणात तीव्र बदल पाहण्याआधी जागतिक नेत्यांनी एकत्र येऊन जगभरातील हवामान बदलाविरूद्ध जलद कृती करणे आवश्यक आहे. कारण वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने समुद्रकिनारी वसलेली 12 शहरे पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.(12 cities in the country, including Mumbai, will be submerged, NASA reports)

NASA ने नुकतेच आंतरशासकीय पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) अहवाल वापरून जगभरातील समुद्र पातळीतील बदलांचे विश्लेषण केले आहे.  हवामान बदलामुळे किनारपट्टीवर वसलेली एकूण 12 भारतीय शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता या अहवालातून समोर आली आहे. त्या 12 शहरांच्या यादीत मुंबईचा ही समावेश आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला एक नवीन संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पाण्याखाली बुडण्याच्या धोक्याचा सामना करत असलेले प्रमुख भारतीय शहर, भारतातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचा अतिशय वाईट परिणाम झाला आहे.  IPCC च्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, सध्याचा हवामानाचा कल कायम राहिल्यास मुंबई शहर 1.9 फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय भारतातील काही शहरेही समुद्रात बुडण्याची शक्यता आहे. चेन्नई -1.87 फूट, मंगलोर -1.87 फूट, भाऊनगर – 2.70 फूट,  मुरगाव – 2.06 फूट, तुतीकोरीन -1.9 फूट, खिदिरपूर – 0.49 फूट, पारादीप – 1.93 फूट, ओखा 1.96 फूट, विशाखापट्टणम – 1.77 फूट, आणि कांडला – 1.87 फूट NASA च्या अहवालानुसार ही शहरेही भविष्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments