खूप काहीहेल्थ

Omicron Variant : मुंबईत लॉकडाऊन लागणार का, लागला तर काय होईल

मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Omicron Variant : कोरोनाचे संकट आजून पूर्णपणे टळले नाही,अशात आता जगातील अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंट या नवीन कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याने अनेक देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबईसह राज्यात निर्बंध लावावे की लावू नये? नवी नियमावली काय असेल? यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.(Will there be a lockdown in Mumbai, if so, what will happen?)

मुंबईत लॉकडाऊन आधी अलर्ट जारी

मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट या नवीन विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मुंबई पालिकेकडून विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे. मुंबईत प्रत्येक वॉर्डमधील वॉर रुम पुन्हा एकदा कार्यरत करण्यात आले आहेत.  प्रत्येक वॉर्डात 10  रुग्णवाहिकांची सुविधा देण्यात आल्या आहेत.

तसेच विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना पालिकेकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर  गेल्या 15 दिवसांत परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे.

दुबईप्रमाणेच नियमावली लागू होणार?

दुबईने 13 देशातील येणाऱ्या विमानांबाबत व प्रवाशांबाबत जी नियमावली तयार केली आहे. तशाच प्रकारची नियमावली महाराष्ट्रामध्ये देखील लागू करावी याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. ही नियमावली तपासून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

तसेच या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभागाने घ्यावा अशा  सूचना देण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाची परिस्थिती, ओमिक्रॉनचा संभाव्य धोका व बदलते हवामान याचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments