खूप काहीटेक

Oshiwara Pool : मुंबईतील ओशिवरा पूल वाहनांच्या प्रवासासाठी खुला…

तब्बल 4 महिन्यांनंतर बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी ओशिवरा पूल आता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Oshiwara Pool : मुंबईकरांसाठी एक चांगली व  आनंदाची बातमी. तब्बल 4 महिन्यांनंतर बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी ओशिवरा पूल आता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या वर्षी 17 ते 18 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरातील पूल बंद करण्यात आला होता. तसेच याच दिवशी विक्रोळी येथे दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना सुद्धा घडली होती.(Oshiwara Pool in Mumbai is open for vehicular travel …)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुलैमधील पावसाने डांबराचा पृष्ठभाग वाहून गेल्याने काँक्रीटचा स्लॅब वर आला होता. त्यामुळे या पूलाच्या दुरुस्तीचे काम चालू होते. तसेच पुलांचे मुख्य अभियंता सतीस ठोसर म्हणाले की ते संपूर्ण विभागाची रुंदी वाढविण्याचे काम करत आहेत, सध्या या पुलावरून हलक्या मोटारींनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने प्रवासासाठी दिलेला  पर्यायी मार्ग हा एकच लेन रस्ता असल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गोरेगावचे नगरसेवक दीपक ठाकूर म्हणाले की, पूल लवकरात लवकर खुला करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठका घेतल्याल्या जात आहेत.

हा पूल एसव्ही रोड आणि राम मंदिराच्या जंक्शनवर आहे व पूर्व ते पश्चिम प्रवासासाठी ते मृणालताई गोर उड्डाणपुलाला जोडते. गोरेगावमध्ये प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी हा पूल महत्त्वाचा कनेक्टर आहे. तसेच मालाड, कांदिवली येथे प्रवास करण्यासाठी लोखंडवाला, ओशिवरा येथील वाहनचालकांसाठीही हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments