Parambir singh scam : पोस्टातील घोटाळेबाजांना परमबीर सिंगांनी दिला होता पाठिंबा, 92 लाखांचा होता घोटाळा
1999 मध्ये पोस्ट कार्डच्या संबंधित एक मोठा घोटाळा समोर आला होता, ज्याच्या संबंधातील अनेक घोष्टी आता समोर येत आहेत.

Parambir singh scam : 1999 च्या काळात तेलगी नावाची टोळी ठाणे-मुंबई परिसरात वावरायची. या टोळीकडून पोस्टामध्ये वापरली जाणारी तिकीटांचे बनावटीकरण केले जायचे. बनावट तिकीटे तयार करून ती विकली जात असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याला मिळाली. या अधिकाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून एक ऑपरेशन राबवले. ते म्हणजे 15 दिवस वेशांतर करून या टोळीची संपूर्ण माहिती जमा केली. पुरावे जमा झाल्यानंतर 1999 च्या 21 ऑगस्ट रोजी आपल्या सहकाऱ्यांसह एकेठिकाणी छापा टाकला. तिथून 21 हजारांची बनावट पोस्टाची तिकिटे, महसूल तिकिटे जप्त केली.
बनावट तिकीटे बवणारी टोळी आणि ती तिकीटे विकणारा अशी तेलगी टोळीची मोठी साखळी निर्माण झाली होती. एकदा छापा टाकल्यानंतर पोस्टामध्ये काम करणाऱ्या भाऊसाहेब जगदाळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि हळू हळू संपूर्ण टीमचा उलघडा होऊ लागला.
बनावट तिकीटांची विक्री हळू हळू मोठ्या प्रमाणात वाढू लागली, परिणामी त्याचे प्रोडक्शनही वाढू लागले, जरी या घोटाळ्याचे केंद्रबिंदू ठाण्यात असले तरी मात्र याला शिवडी कनेक्शन होतं, कारण तिकीटांना छिद्र पाडायची मशीन ही शिवडीमध्ये होती. तिथून पोलिसांनी ती मशीन आणि काही बनावट कागदपत्रे ताब्यात घेतली. इतकं सगळे होत असताना या सगळ्याला मिंट रोड कनेक्शन असल्याचं समोर आलं. मिंट रोडमध्ये असलेल्या अक्षर मुद्रणालयामध्ये तब्बल 98 लाखांची बनावट तिकीट आणि मुद्रांक छापली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ तिथे छापा टाकण्याचा निर्णय़ घेतला, मात्र तेवढ्यात त्यावेळेचे पोलीस निरीक्षक पाटील यांचा फोन आला की अक्षर मुद्राणालयाला सील करू नका. पोलीस निरीक्षक पाटील आणि परमबीर सिंह हे खूप जवळचे असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने नंतर काही पत्रकारांना सांगितलं.
ज्या अधिकाऱ्याने हे संपूर्ण प्रकरण समोर आणलं त्याच अधिकाऱ्याची काही दिवसांनी बदली केली. त्याचे अनेक छळ केल्याचंही त्या अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितलं. एकंदरित हा गुन्हा सिद्ध होणे अजून बाकी आहे, मात्र परमबीर सिंह यांच्यावरील अनेक आरोप सध्या समोर येत आहे.
हेही वाचा…