खूप काही

Pollution Control Certificate : वाहन चलकांसाठी नवा नियम,PUC नसल्यास होऊ शकते 6 महिन्याचा कारावास व 10000 रुपये दंड…

वाहन चालकांकडे PUC नसल्यास, त्यांच्याकडून  10000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

Pollution Control Certificate : मुंबईत प्रदूषणामध्ये घट झाली असली,तरी मुंबईतील प्रदूषणाची वाढती समस्या लक्षात घेऊन सरकारने वाहनांबाबत एक नवीन अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC असणे आवश्यक आहे. असा नवा नियम सरकारने लागू केला आहे. जर वाहन चालकांकडे PUC नसल्यास, त्यांच्याकडून  10000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच या नव्या नियमात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली आहे.(New rules for drivers, without PUC can lead to 6 months imprisonment and a fine of Rs 10,000 …)

PUC ची किंमत किती आहे?

PUC प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळे शुल्क आहे.  पेट्रोल व CNG, दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी प्रदूषण चाचणी शुल्क 60 रुपये आहे.  जर तुम्हाला चारचाकी वाहनांसाठी PUC प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर तुम्हाला 80 रुपये शुल्क द्यावे लागेल.  तर डिझेल वाहनांसाठी प्रदूषण चाचणी प्रमाणपत्र शुल्क 100 रुपये आहे.

काय आहेत नवीन नियम

दुचाकी असो की कार, सर्व वाहनांसाठी PUC प्रमाणपत्र अनिवार्य झाले आहे. PUC  प्रमाणपत्र नसलेले किंवा कालबाह्य पीयूसी असलेले चालक वाहन चालवताना पकडले गेल्यास दंड होऊ शकतो.  ट्रॅफिक पोलिसांना वैध PUC प्रमाणपत्र न दाखवल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास व 10,000 रुपये दंड  आकारला जाऊ शकतो. PUC  प्रमाणपत्र नसल्यास चालकाचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. तसेच PUC प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणे धोकादायक ठरू शकते.

नियम काय म्हणतो?

केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 नुसार, देशातील प्रत्येक मोटार वाहनाला (BS1, BS2, BS3, BS4 तसेच CNG आणि LPG वाहने) वैध PUC असणे आवश्यक आहे.  PUC प्रमाणपत्राची वैधता चारचाकी BS4 वाहनांसाठी एक वर्ष व इतर वाहनांसाठी 3 महिने आहे.

या वेळी दिवाळीच्या मुहूर्तावर, SAFAR ने जाहीर केलेली मुंबईची हवेच्या गुणवत्तेची रँकिंग ‘कमीतकमी धोकादायक’ पातळीची होती.  कारण यावेळी प्रत्येक दिवाळीपेक्षा कमी फटाके फोडले गेले.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments