कारणराजकारण

Prime Minister Narendra Modi : काय होते कृषी कायदे, मोदींनी 3 कायदे माघार का घेतल

त्यामुळे हे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आमचे सरकार घेत आहे, असे मोदींनी जाहीर केले.

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मंत्र्यांच्या व तज्ज्ञांच्या परवानगीने शेतकऱ्यांच्या हितासाठी 3 कृषी कायदे 27 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी करून संमती दिल्यानंतर देशात आणले होते. काही शेतकऱ्यांनी या कायद्यांचे स्वागत केले,तर काही शेतकऱ्यांकडून या कायद्यांना प्रचंड विरोध करण्यात आला व देशभरात आंदोलने सुरू करण्यात आली.(What happened to agriculture laws, why Modi withdrew 3 laws)

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठे यश आले असून,  19 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना त्यांनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावे, शेतात जाऊन काम सुरू करावे, एक नवी सुरुवात करावी, असे आवाहन मोदींनी शेतकऱ्यांना केले आहे.

तसेच नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले गेले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय  उपलब्ध व्हावे, हा उद्देश त्या कायद्यांमागे होता.  देशातील अनेक शेतकऱ्यांनी या कायद्यांचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हे तीन कायदे आणले होते. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना ही गोष्ट आमचे सरकार समजावू शकले नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही कमी राहिली असेल. त्यामुळे हे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आमचे सरकार घेत आहे, असे मोदींनी जाहीर केले.

पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा करून काही मार्ग काढण्याचे प्रयत्न केले, परंतु ते अपयशी ठरले व  त्यांचा विरोध कायम राहिला. आज गुरुनानक जयंती असून आजचा दिवस पवित्र दिवस मानला जातो. आम्ही  कोणालाही दोष देत नाही. कदाचित आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आम्ही त्या शेतकऱ्यांची समजूत घालण्यात कमी पडलो, असे मला वाटते. त्यामुळेच हे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

 

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments