आपलं शहरखूप काहीघटनाफेमसमंत्रालयराजकारण

Samir Wankhede case : कबूल..कबूल..कबूल…. मालिकांनी फोडला मोठा बॉम्ब

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर हल्ला सुरूच आहे.

कार्डेलीया क्रुझचे प्रकरण दिवसेंदिवस नवीन वळण घेत आहे आणि या वळणाला थांबा कधी येईल याची कोणालाच खबर नाही. (Samir Wankhede case: Kabool .. Kabool ..Kabool…. Big bomb exploded by the Malik)

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांचा फेरा अद्याप संपलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर हल्ला सुरूच आहे. ताज्या प्रकरणात नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टोला लगावला आहे.
सोमवारी मलिकांनी समीर वानखेडेंचा ‘निकाह’चा फोटो ट्विटरवर शेअर केला. गेल्या अनेक आठवड्यांपासून समीर वानखेडे हे नवाब मलिकांच्या निशाण्यावर होते.
नवाब मलिक यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये वानखेडेंचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मलिकांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे मुस्लिम असून हे छायाचित्र त्यांच्या निकाहाच्या वेळचे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
फोटो शेअर करत मलिकांने त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘कुबूल है, कबुल है, कबुल है. समीर दाऊद वानखेडे,हे तू काय केलेस?’ या ट्विटसोबत एक छायाचित्र आहे, ज्यामध्ये समीर मुस्लिम टोपी घालून काझीसोबत बसले आहेत. यामध्ये ते निकाहाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधीही मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक मोठे आणि गंभीर आरोप केले होते, त्यात खोटी माहिती देऊन नोकरी मिळवल्याचाही एक आरोप आहे. मात्र, वानखेडे यांनी याबाबतचे आरोप फेटाळून लावले होते.

Photograph of Sameer Dawood Wankhede signing his ‘Nikah Nama’ pic.twitter.com/lSQz56RqoW

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 22, 2021

 

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments