आपलं शहरस्पोर्ट

Shardul Thakur : सोशल मीडिया गाजवतोय शार्दुलचा साखरपुडा …

भारतीय क्रिकेट संघातील एक मराठमोळा क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत .

भारतीय क्रिकेट संघातील एक मराठमोळा क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शार्दुलने सोमवारी एका छोट्या सोहळ्यात त्याचा साखरपुडा उरकला आहे. त्याने त्याची प्रेयसी मिताली परुळेकर हिच्यासह साखरपुडा केला आहे.मुंबईतील बीकेसीमध्ये पार पडलेला हा साखरपुडा कोरोनाचे सगळ्या खबरदाऱ्या आणि अटी लक्षात घेऊन संपन्न झाला आहे.केवळ 75 जणांसह पार पडलेल्या या कार्यक्रमात दोघांकडच्या कुटुंबीयांचे आणि मित्रमंडळींचा समावेश होता. (Shardul Thakur: Shardul’s engagement is getting viral on social media…)

शार्दूल आणि मितालीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. मिताली आणि शार्दूल गेल्या बऱ्याच दिवसांपासून रीलेशनशीपमध्ये होते. पण नुकत्याच झालेल्या साखरपुड्यानंतर या नात्याला एक नवीन नाव आले आहे.

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकानंतर मिळालेल्या विश्रांतीमध्ये शार्दूलने त्याचा साखरपुडा उरकुन घेतला.पुढीलवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर शार्दूल त्याच्या लग्नाचा बार उडवणार आहे.

 

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments