खूप काहीटेक

Special Night Traffic Block : विद्याविहार, कांजूर स्थानकादरम्यान स्पेशल नाईट ट्रॅफिक ब्लॉक, पहा कधी असेल हा ब्लॉक…

रात्री 12.30 ते सकाळी 5.30 या वेळेत विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Special Night Traffic Block : मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी. मध्य रेल्वेच्या विद्याविहार व कांजूरमार्ग दरम्यान अप डाऊन धिम्या मार्गावर 13 व 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री विक्रोळी स्थानकादरम्यान ओल्ड वॉरेन ‘एन’ प्रकारातील FOB-D सुरू करण्यासाठी रात्री 12.30 ते सकाळी 5.30 या वेळेत विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.(Special night traffic block between Vidyavihar, Kanjur station, see when this block will be …)

या ब्लॉकमुळे माटुंग्याहून रात्री 12.05 ते सकाळी 5.21 या वेळेत सुटणाऱ्या  धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा व मुलुंड स्थानकांदरम्यान  जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

तसेच मुलुंडहून रात्री 12.27 ते सकाळी 5.23 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर या ब्लॉक कालावधीत विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर येथे धीम्या मार्गावरील सेवा बंद करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments