आपलं शहरखूप काहीघटनाफेमसबीएमसीमंत्रालयराजकारण

ST Worker Strike : अखेर आझाद मैदानावरील आंदोलनाने घेतली माघार ,मात्र कर्मचाऱ्यांचा संप सुरूच …

जरी या दोन नेत्यांनी आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतले तरी कर्मचाऱ्यांचा संप कायम असणार .

मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका ठाम मांडली. त्यांनी सरकारच्या 24 तारखे रोजी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र ST कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. (ST Worker Strike: Finally, the agitation at Azad Maidan withdrew, but the strike continues …)

भाजप नेते सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘ सरकारने घेतलेला कालचा निर्णय हे कामगारांचे पाहिले यश आहे . कामगाराच्या मूळ वेतनात जी वाढ झाली आहे ती ST कामगारांच्या इतिहासातील फार दिलासादायक वाढ आहे .सरकार दोन पाऊले पुढे येत आहे म्हणून आम्ही सुद्धा दोन पाऊले पुढे येऊन , आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेत आहोत ” असे सदाभाऊ खोत आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

ते म्हणाले की , ” जरी आम्ही आंदोलन मागे घेत असलो तरी आमचा कर्मचाऱ्यांना पाठिंबा आहे तसाच राहील. उर्वरित राज्यातील संपाविषयीचा निर्णय हा कर्मचाऱ्यांनी आपापसात चर्चा करून घ्यावा. तरीही विलीनीकरणाची लढाई अजून चालूच आहे आणि विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आपण हा लढा कायम ठेवण्याचे आश्वासन सदाभाऊ खोतांनी St करमचाऱ्यांना दिले .

आम्ही आंदोलनात आमदार म्हणून सहभागी नसल्याचे वक्तव्य भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी केले.त्यांनी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पहिल्या यशाचे कौतुक करून आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरता मागे घेण्याचा निर्णय स्पष्ट केला.

जरी या दोन नेत्यांनी आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतले तरी कर्मचाऱ्यांचा संप कायम असणार असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments