खूप काहीस्पोर्ट

T20 World Cup : पाकिस्तान संघ नेमका कुठं चुकला, PAKvsAUS संघातील सगळ्यात महत्त्वाचं वळण

12 नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलिया vs  पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. 

T20 World Cup : 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलिया vs  पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे.  मॅथ्यु वेडला जीवदान मिळाल्यानंतर त्याने शाहीन शाह आफ्रिदीवर सलग तीन षटकार खेचले आणि मार्कस स्टाॅइनिस सह 40 चेंडूत 81 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने गुरूवारच्या सामन्यात काही  अनुकूल क्षण झेलल्यानंतर पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला .अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना न्युझीलंड सोबत होणार आहे.(Exactly where the Pakistan team went wrong, the most important turn in the PAKvsAUS team)

गुरूवारच्या रंगतदार सामन्यात पाकिस्तानने 20 षटकात 4 गडी गमावून 176 धावा केल्या, त्यास प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियाने 19 षटकात 5 गडी गमावून 176 धावा केल्या व पाकिस्ताच्या संघाला हरवत विजय मिळवला . वेडने आफ्रिदीच्या 19 व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूवर शॉर्ट फाईन लेग , काऊ कॉर्नर  आणि फाईन लेगवर  विजयी षटकार ठोकला. मॅथ्यु वेडला ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ म्हणून गौवरण्यात आले . पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा ऑस्ट्रेलियाने घेतला.

ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे . ह्यात एक विशेष गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा आणि न्युझीलंड पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments