आपलं शहरबीएमसी

Textile Museum : 2022 च्या निवडणुकी आधी BMC उभारणार कापड संग्रहालय; पहा काय आहे व्यवस्था

BMC मुंबईमध्ये वस्त्र संग्रहालय उभारणार आहे.

Textile Museum : BMC मुंबईमध्ये वस्त्र संग्रहालय उभारणार आहे. त्यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने बुधवारी माहिती की, BMC निवडणूक 2022 च्या आधी, मुंबईमध्ये वस्त्र संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे काम पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.(BMC to set up textile museum before 2022 elections;  See what the arrangement is)

मुंबईच्या पूर्वीच्या गिरणी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी नागरी संस्थेने युनायटेड मिल्स कंपाऊंड 2 व  3 येथे कापड संग्रहालयाचे बांधकाम सुरू केले आहे. 16.3 एकर जागेवर पसरलेले हे संग्रहालय मुंबईच्या वस्त्रोद्योग वारशाचे दस्तऐवजीकरण, संग्रहण आणि प्रतिनिधित्व करणार आहे.

BMC च्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्याची त्यांची योजना होती.  मात्र त्यासाठी आणखी किमान तीन वर्षे लागणार आहेत.  पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये पूर्ण होईल, त्यानंतर हे कापड संग्रहालय जनतेसाठी खुला करण्यात येईल.  मात्र, तिकीट व किंमत अद्याप ठरलेली नाही.

फेज 1 मध्ये वस्तुसंग्रहालयासाठी प्रत्यक्ष प्रदर्शनाचा समावेश नसला तरी, त्यात गिरणीच्या आवारातील त्रिमितीय मल्टीमीडिया वॉटर फवार्‍यांचे पर्यटन आकर्षण समाविष्ट करण्यात आला आहे.  तसेच हे म्युझिकल फाउंटन शो देखील आयोजित करू शकते. माहितीनुसार म्युझिकल फाउंटनसाठी चार वर्षांसाठी नागरी संस्थेला 19 कोटी रुपये, ऑपरेशन आणि देखभालसाठी अतिरिक्त 3 कोटी रुपये लागणार आहेत.

पहिल्या भागामध्ये परिसराची पायाभूत सुविधा सुधारणे, गेट, ग्रिल पुनर्संचयित करणे व कॅन्टीन बांधणे समाविष्ट होते.  प्रकल्पाचा हा भाग पूर्ण झाला आहे.  भाग दोनमध्ये परिसराचे लँडस्केपिंग, ओपन-टू-एअर अँम्फीथिएटर बांधणे, तलावाची साफसफाई व संगीत कारंजे स्थापित करणे समाविष्ट आहे.  नागरिकांना अँम्फीथिएटरमधून मैफल पाहता येणार आहे.

BMC प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यावर एकत्रितपणे काम करेल, ज्यामध्ये संग्रहालयाचे प्रदर्शन, संपूर्ण इमारतीची संरचनात्मक पुनर्स्थापना, प्लंबिंग, ड्रेनेज, अग्निसुरक्षा आणि बरेच काही समाविष्ट आहे.  यास आणखी तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे, त्यानंतर, नागरी संस्था संग्रहालयाच्या प्रदर्शनासाठी वस्तू खरेदी करण्यास सुरवात करणार आहे. अशी माहिती BMC अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments