आपलं शहरलोकल

Western Railway : पश्चिम रेल्वेत 12 ऐवजी धावणार 20 AC लोकल,भाडेही कमी होण्याची शक्यता…

पश्चिम रेल्वेने AC लोकल ही नागरीकांसाठी अधिक सुलभ करण्यावर भर दिले आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेने AC लोकलच्या सेवांची वाढ करून , सिंगल-जर्नी तिकिटांसाठी भाडे रचना सुधारण्याचे नियोजन केले आहे. पश्चिम रेल्वेने AC लोकल ही नागरीकांसाठी अधिक सुलभ करण्यावर भर दिले आहे. (Western Railway will run 20 AC locomotives instead of 12, fares are also likely to be reduced …)

25 डिसेंबर 2017 रोजी पहिल्यांदा वातानुकूलित लोकल गाड्या सुरू केल्यानंतर जवळपास 4 वर्षांनंतर ,पश्चिम रेल्वे आता आणखी 8 AC लोकल सेवा जोडण्याची योजना तयार करत आहे. त्यामानाने स्थानकांवरून दररोज एकूण 20 AC लोकल सोडल्या जातील.

कोरोना महामारीच्या आधी सुमारे 20,000 प्रवाशांनी दररोज 12 एसी लोकल सेवांचा लाभ घेतला होता. परंतु आता या AC लोकलची संख्या 20 वर पोहचली आहे. चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान 8 नवीन सेवा प्रस्तापित आहेत. यातील काही सेवा गोरेगाव , बोरिवली आणि नालासोपारा येथून सुरू होतील व तेथेच थांबतील.

AC लोकलला लोकांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी पश्चिम रेल्वे येत्या काळात AC लोकलचे तिकीट आणखी कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. असे सांगण्यात येत आहे की या लोकलचे तिकिटाचे भाडे मेट्रोच्या तिकिटाच्या भाड्यासारखे असू शकते.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments