
Winter season : हिवाळा ऋतूचे आगमन झाले असून, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तरेकडील थंड हवेचा प्रवाह वाढल्याने राज्यात दिवसेंदिवस थंडी वाढत चालली आहे.(Where cold, where the possibility of rain, sudden change in the climate of Maharashtra)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या 3 दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. तसेच गेल्या 15 दिवसांपासून राज्याच्या तापमानातील ही घट सुरूच आहे , त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना पुढील आठवडा थंडीमध्येच काढावा लागणार आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे राज्यात उबदार कपड्यांची मोठी मागणी होत आहे. थंडीमुळे पहाटेच्या वेळी अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसते. हिवाळा म्हटलं की लोकांमध्ये आरोग्यासंबधित चिंतेचे वातावरणही पसरते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे लोक त्यांच्या आरोग्याकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देत आहेत.
सध्या देशाच्या वातावरणात अनेक बदल होताना दिसत आहेत. एकीकडे थंडीची चाहूल, तर देशाच्या दक्षिण भागाकडे मुसळधार पाऊस पडत आहे . याचाच परिणाम कुठेतरी महाराष्ट्राच्या वातावरणावर होत आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने सांगितले की, दक्षिण भारतात मुसळधार पावसामुळे शुक्रवार ते रविवार राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :