Uncategorized

Ashish Shelar vs Kishori Pednekar : आशिष शेलार सांगणार ‘त्या’ पार्टीतील ‘मंत्र्याचे नाव’?

जर सरकारचा मंत्री त्या पार्टीत उपस्थित होता, तर तो मंत्री कोण होता हे स्पष्ट करावे? असा इशारा किशोरी पेडणेकरांनी आशिष शेलारांना दिला.

 

कोरोनाचे सावट अजून कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही देशात लॉकडाऊनही जाहीर झाला आहे. परंतू कोरोनाचे हे सावट असतानादेखील कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. हा नियमांचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. कारण दिग्दर्शक करण जोहोरने आयोजित केलेल्या पार्टीमुळे.

(Ashish Shelar vs Kishori Pednekar: Will Ashish Shelar say ‘name of the minister’ in ‘that’ party?)

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या पार्टीत जे सेलेब्रिटी सहभागी झालेले होते, त्यातील दोन अभिनेत्री म्हणजे करिना कपूर खान आणि अमृता अरोरा सोबत इतरांनाही कोरोनाची लागण झाली.

करन जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमुळेच कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे. या पार्टीमध्ये महविकास आघाडी सरकारचा एक मंत्रीही सहभागी होता अशी टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केली होती. आशिष शेलार यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना मुंबई महानगपालिकेतच्या महापौर किशोरी पेडणेकर टोला लगावला आहे.

आम्ही शिवसेनेच्या वाघिणी असून असले बिनबुडाचे आरोप सहन करणार नाही. जर सरकारचा मंत्री त्या पार्टीत उपस्थित होता, तर तो मंत्री कोण होता हे स्पष्ट करावे? असा इशारा किशोरी पेडणेकरांनी आशिष शेलारांना दिला. यावर आता आशिष शेलार त्या पार्टीतील मंत्री कोण होते, त्याचे नाव सांगणार का, हेच पाहणे आता गरजेचे असेल.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments