
कोरोना रुग्णसंख्या जशी वाढू लागली तशी आरोग्य व्यस्थेवरील ताण वाढू लागला. रुग्णांवर त्वरीत उपचार आणि रुग्णालयातील ताण कमी करण्यासाठी सरकारी जागा, शाळा व महाविद्यालय इत्यादी ठिकाणी स्वतंत्र अशी कोविड उपाय योजना केंद्र सुरू करण्यात आली.(BMC school: School starts but treatment of corona patients in schools…)
या सगळ्यामुळे गेली दीड वर्ष शाळा बंद असल्याने आता पुन्हा नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यात आल्या. पण शाळा सुरू होऊनही मुंबई महानगर पालिका शाळांचा वापर सर्रास कोरोना उपाय योजनांसाठी सुरू आहे.
कोरोना उपचारांसाठी आणि लसीकरणासाठी वापरण्यास घेतलेल्या या शालेय इमारती आणि वर्ग पुन्हा ताब्यात घेण्यास शिक्षण विभाग यशस्वी दिसत नाही. जर ही आकडेवारी पाहिली तर आपल्या दिसून येते की, 77 इमारती या कोरोना उपचारांसाठी तर 06 इमारती या शिक्षणासाठी देण्यात आल्या आहेत.
556 खोल्या या विविध संस्थांना देण्यात आल्या असून फक्त 18 वर्गखोल्या महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. 41 सभागृहातील फक्त 01 सभागृह पालिकेच्या ताब्यात आले आहे.
म्हणजेच शाळा सुरू झाली ती म्हणजे फक्त पूर्व उपनगरातील 02 इमारती आणि 10 वर्ग खोल्यांनमध्येच.
हे हि वाचा :