आपलं शहरबीएमसीविद्यापीठ

BMC School : पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार इंटरनॅशनल शिक्षण

इंटरनॅशनल बॅकॉलोरेट (IB) आणि IGCSE या आंतरराष्ट्रीय बोर्डाची प्रत्येकी एक शाळा मुंबईमध्ये येत्या नवीन शैक्षणिक अर्थात जून महिन्यापासून सुरु होणार.

सर्वच पालकांचा आपल्या पाल्यांनी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा आग्रह असतो. परस्थिती कशी ही असली तरी आपल्या पाल्याला उच्च आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अनेक पालक प्रयत्न करत असतात. ( BMC School: Students studying in municipal schools will get international education )

आज संपूर्ण देशासह राज्यात सरकारी शाळा असूनदेखील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटताना दिसते. तिथली शिक्षण पद्धती, वेगवेगळ्या सुविधा आणि इतर कारणेही त्याला कारणीभूत आहेत. परंतु मुंबई पालिकेने एक वेगळा प्रयत्न करण्याचा पुढाकार घेतला आहे.

आपल्या महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असुन आता विद्यार्थ्यांना महापालिका शाळांमध्ये थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.

या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमात नर्सरी ते दहावी पर्यंतचे शिक्षण, नर्सरी ते पाचवीच्या वर्गासाठी Primary Years Programme (PYP) अंतर्गत मोफत शिक्षणं, सहावी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी middle year programme मार्फत मोफत शिक्षण आणि आणखी सुविधा मिळणार आहेत.

राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून CBSE आणि ICSE अभ्यासक्रमातून हा उपक्रम सुरू केल्यानंतर इंटरनॅशनल बॅकॉलोरेट (IB) आणि IGCSE या आंतरराष्ट्रीय बोर्डाची प्रत्येकी एक शाळा मुंबईमध्ये येत्या नवीन शैक्षणिक अर्थात जून महिन्यापासून सुरु होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी IB बोर्ड सोबत झालेल्या बैठकीत दिली.

 

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments