बीएमसी

पार्किंग किंवा टेरेसवर नाचगाणं कराल, तर महागात पडेल

गतवर्षाचा शेवट आणि नवं1वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला जल्लोष केला जातो

गतवर्षाचा शेवट आणि नवं1वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला जल्लोष केला जातो. सेलिब्रेशन करण्यासाठी हाॅटेल, फार्महाऊसवर गर्दी केली जाते, इतकं नाही तर अनेक लोकांकडून सोसायटीच्या गच्चीवर पार्टीचा बेत केला जातो, मात्र असे करणार असाल तर सावधान, तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

सोसायटीच्या पार्किंगमध्ये किंवा गच्चीवर नविन वर्षाचे सेलिब्रेशन करणार असाल तर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महानगर पालिका आणि पोलीसांकडून निर्बंध घालण्यास सुरवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे सोसायटी आवारात गर्दी करून सरत्या वर्षांला निरोप देणे आणि नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करणे महागात पडू शकते. पोलीसांकडून अचानक छापामारी करून दारू पिणाऱ्यांवर, दंगा करणार्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. त्याच बरोबर अटकेची कारवाईसुध्दा होवू शकते. दुसरीकडे रात्री मध्यपान करून रस्त्यांवर गाडीने राऊंड मारणाऱ्या मध्यपिंनासुध्दा चाप लावण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने ठेवला जाणार असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी दिलीये.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments