आपलं शहरबीएमसीलोकल

DIGITAL BEST : पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते पार पडला ‘चलो ॲप’, ‘बेस्ट स्मार्ट कार्डचा’ उद्घाटन सोहळा…

सोहळ्यात अनेक दिग्गज नेते व बेस्ट समितीचे वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते.

बेस्ट बसने प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना डिजिटल सुविधा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने चलो ॲपसोबत भागीदारी केली असून, त्यानंतर आता बेस्ट बसेसचे तिकीट आणि पास चलो ॲपद्वारे ऑनलाइन बुक करता येणार आहेत. ( DIGITAL BEST: Inauguration Ceremony of ‘Chalo App’, ‘Best Smart Card’ passed by Environment Minister …)

पर्यटन,पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री नामदार माननीय श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या शुभहस्ते सह्याद्री अतिथी गृह येथे 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11: 30च्या सुमारास ‘चलो ॲप’ आणि बेस्ट स्मार्ट कार्डचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला . यावेळी अनेक दिग्गज नेते व बेस्ट समितीचे वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते.बेस्ट समिती अध्यक्ष श्री. आशिष चेंबुरकर, बेस्ट समिती सदस्य सर्वश्री अनिल कोकीळ, सुनिल अहिर, बबन कनावजे, राजेश ठक्कर, अनिल पाटणकर, दत्ता नरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, पी. वेलरासू आणि बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्र उपस्थित होते.

सध्या आपल्याकडे फक्त 386 पर्यावरण स्नेही वातानुकूलित बसगाड्या आहेत पण 2027 पर्यंत बेस्टमध्ये 100% वातानुकूलित बसेस समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट असण्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले. ते म्हणाले की , “डिजिटल बेस्ट 2.0 उपक्रमांतर्गत मायक्रो बॅंकिंग, इ-कॉमर्स ट्रेड अशा विविध प्रकारच्या लोकोपयोगी योजनासुध्दा कार्यान्वित करण्यात येतील.”

बेस्ट समिती अध्यक्ष श्री. आशिष चेंबुरकर म्हणाले की, “एवढ्या पर्यावरणस्नेही बसगाड्या संपूर्ण भारतात कोणत्याही उपक्रमाच्या नाहीत.” त्यांनी सूचना केली की ,”200 दुमजली पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करताना ॲप मध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी बटण देखील कार्यान्वित करावे.”

पर्यटन,पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री नामदार माननीय श्री. आदित्यजी ठाकरेजींनी या योजनेचे कौतुक करून बेस्ट समिती बद्दल अभिमान व्यक्त केले. आदित्य ठाकरे म्हणाले की ,” बेस्टचा हा उपक्रम तांत्रिकदृष्ट्या एक पाऊल पुढे आहे .” ठाकरेंनी लागेल ती मदत करायला ते तयार असल्याचे सांगून बेस्ट समितीच्या पाठीवर अभिमानाने थाप दिली. त्यांनी 70 रुपयात 10 मोफत फेऱ्या आणि फ्लेक्सिबल रिचार्ज अशा दोन योजनांची आज घोषणा केली. त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी हॉटेल मध्ये सदर स्मार्ट कार्ड उपलब्ध करावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

 

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments