आपलं शहर

Fake Vaccination Certificate : कोरोना लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक…

मुंबईत चक्क कोरोनाचे बोगस लसीकरण प्रमाणपत्र विकले जात आहेत.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत काही जण या परिस्थितीचा दुरुपयोग करून अवैध मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ( Fake Vaccination Certificate: Two accused arrested in sale of bogus certificate of corona vaccination … )

अशीच एक घटना मुंबईत घडली आहे जिथे चक्क कोरोनाचे बोगस लसीकरण प्रमाणपत्र विकले जात होते. परंतु मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी घटनेचा तपास घेता रविवारी, 19 डिसेंबर रोजी दोन आरोपींना अटक केली.

घटनेतील आरोपींचे नावे जुबेर शेख (वय 19 वर्षे) आणि अलफैज खान असे असून ते उत्तरप्रदेशातील प्रतापगडामधील एका डॉक्टरच्या साहाय्याने हे दोघे खोटे लसीकरण प्रमाणपत्र बनवत होते आणि ज्यांचे लसीकरण झाले नाही , त्यांना हे बोगस प्रमाणपत्र विकत होते , अशी माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली.

दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

 

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments