Uncategorized

Mazi Metro Rang De Metro: 14 वर्षीय वेदांत शिंदे याने पटकावला ‘माझी मेट्रो रंग दे मेट्रो’ स्पर्धेचा विशेष पुरस्कार …

सर्वांना आपल्या चित्राने आकर्षित करणारा वेदांत 14 वर्षाचा असून खुल्या प्रवर्गातील सर्वात लहान स्पर्धक होता.

‘माझी मेट्रो रंग दे मेट्रो ‘ या खुल्या प्रवर्गातील चित्रकला स्पर्धेचे आयोजन मुंबई मेट्रोचा वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेस विशेष कारण म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्ष. (Mazi Metro Rang De Metro : 14 year old Vedanta Shinde won the special award of ‘Majhi Metro Rang De Metro’ competition …)

भारतातील तब्बल 12 राज्य या स्पर्धेत सहभागी झाले होते. 12 राज्यातील खुल्या प्रवर्गातून सहभाग झालेल्या कलाकारांची संख्या सुमारे 3,400 होती. परंतु त्यातील महाराष्ट्राचा बालकलाकार वेदांत शिंदेने या कार्यक्रमतील सर्वांना आकर्षित केले आहे. इतकेच नाही तर सर्वांना आपल्या चित्राने आकर्षित करणारा वेदांत 14 वर्षाचा असून खुल्या प्रवर्गातील सर्वात लहान स्पर्धक होता.

वेदांत शिंदेने ‘माझी मेट्रो रंग दे मेट्रो’ या स्पर्धेत सर्वांना आकर्षित केले पण आकर्षित करण्याचे कारण ही विशेष होते. खुल्या वर्गातील या बालकलाकर वेदांतने ‘स्पिरीट ऑफ मुंबई’ या संकल्पनेवर ज्या गोष्टींसाठी मुंबई ओळखली जाते ती सर्व चित्रे एकत्रित करून त्याने हे चित्र रेखाटले होते. एवढा लहान स्पर्धक असून ही त्याच्या कलेमुळे या स्पर्धेचा विशेष पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आला. वेदांतचे हे आकर्षक चित्र आता मुंबईतील डी.एन.नगर या मेट्रो स्थानकाच्या मोठ्या भिंतीवर लावण्यात येणार आहे.

त्याने रेखाटलेले चित्र आणि त्याला मिळालेला पुरस्कार यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा असून त्याचे कौतुक राज्यभर केले जात आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments