आपलं शहरबीएमसी

Mumbai Breaking : मुंबईमध्ये प्रवास करताना सावधान, BMC ने लागू केली नवी नियमावली

जर एखाद्या प्रवाशाने या नियमांचे पालन न केल्यास, त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व महामारी कायदा, 1897 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Mumbai Breaking : ओमिक्रॉनच संकट आता मुंबईवर येऊन ठेपले आहे, अशात BMC ने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. दिवसातून पाच वेळा फोन कॉल्सपासून प्रत्यक्ष भेटीपर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ओमिक्रॉन धोक्याच्या दरम्यान ‘जोखीम असलेल्या’ देशांमधून आलेले व होम क्वारंटाईन केलेल्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी नियमांचा एक संच जारी केला आहे .(Beware while traveling in Mumbai, BMC has implemented new rules)

अशा प्रवाशांकडून क्वारंटाईनचे नियम पाळले जात आहेत याची खात्री करण्यासाठी मुंबई नागरी संस्था गृहनिर्माण संस्थांनाही पत्र लिहिणार आहे. जर एखाद्या प्रवाशाने या नियमांचे पालन न केल्यास, त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व महामारी कायदा, 1897 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रवाशांच्या आरोग्याचा मागोवा ठेवण्यासाठी महापालिकेने 3 डिसेंबर रोजी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल म्हणाले की, नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश मुंबईत ओमिक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जारी करण्यात आली आहेत. MCGM (BMC) ने जोखीम असलेल्या देशांतून मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक अतिशय अनोखी व कठोर होम क्वारंटाईन मॉनिटरिंग यंत्रणा सुरू केली आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) दररोज जोखीम असलेल्या व हाय रिस्क देशांतून मुंबईत येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आणि गेल्या 15 दिवसांत अशा देशांना भेट देणाऱ्यांची यादी सादर करणार आहे. मात्र, या यादीत फक्त मुंबईत राहणाऱ्या प्रवाशांची नावे असतील.

यादी मिळाल्यानंतर, आपत्ती व्यवस्थापन कक्ष त्यांच्या पत्त्यावर आधारित 24 प्रशासकीय वॉर्डांना पाठवेल. तेथून, वॉर्ड वॉर रूम ट्रॅक, चाचणी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केली जाईल.

BMC च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वॉर रूमचे कर्मचारी दिवसातून पाच वेळा होम क्वारंटाईनमधील प्रवाशांना कॉल करतील. ते त्यांना लक्षणांबद्दल विचारतील तसेच सात दिवस घरी राहण्याची विनंती करतील. प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे याची खात्री करण्यासाठी कर्मचारी अशा घरांना प्रत्यक्ष भेटी देखील देतील, तसेच BMC ने पुढे सांगितले की, जर गृहनिर्माण संस्थांना आढळले की एखादी व्यक्ती प्रोटोकॉलचे पालन करत नाही, तर ते वॉर्ड वॉर रूमला कळवू शकतात.

संबंधित वैद्यकीय अधिकारी गृहनिर्माण सोसायट्यांना एक पत्र जारी करून प्रवाशांची माहिती देतील, जेणेकरून अशा घरांमध्ये अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. होम क्वारंटाइनच्या सातव्या दिवशी, वॉर रूममधील कर्मचारी प्रवाशाला आरटी-पीसीआर चाचणी घेण्यास सांगतात. प्रवाश्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास, त्याला ताबडतोब BMC च्या सुविधांमध्ये उपचारासाठी हलवण्यात येईल.

BMC च्या म्हणण्यानुसार, ‘जोखीम असलेल्या देशांमधून मुंबईत आलेल्या 14 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यामध्ये ओमिक्रॉन प्रकार तपासण्यासाठी त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments