बीएमसी

मुंबईतील क्वारंटाईनचे नियम बदलले, पाहा कोणाला लागू होणार नवीन नियम

दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईमध्ये क्वारंटाईन करण्यासाठीचे नियम बदल्यान आले आहेत.

Quarantine Rules : दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईमध्ये क्वारंटाईन करण्यासाठीचे नियम बदल्यान आले आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (REUTERS) येणारे अनेक प्रवाशी मास्क घालून तसेच निघून जातात, त्यामुळे बीएमसीकडून पुन्हा तशा नागरिकांची शोधमोहिम सुरु होते. कारण अनेक प्रवासी दुबईहून येऊनही बीएमसीकडे आपली माहिती देत नाहीत.

दुबईच्या फ्लाइटमध्ये चढणाऱ्या आणि मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना आता सात दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शुक्रवारी एका आदेशात म्हटले आहे. प्रवाशी मुंबईत आल्यानंतर आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, परंतु सात दिवसांनी चाचणी केली जाईल. त्यांची चाचणी निगेटिव्ह असल्यास, त्यांना आणखी सात दिवस स्व-निरीक्षण करावे लागेल. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन व्हावं लागेल, असा आदेश बीएमसीकडून काढण्यात आला आहे.

“दुबई हे असं केंद्र आहे, जिथे बरेच प्रवासी फ्लाइट बदलतात आणि त्यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक प्रवाशांचा एकमेकांशी संपर्क येतो. “म्हणून, दुबईहून येणाऱ्या प्रवाशांकडून मुंबईत ओमिक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता, अशा प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

परदेशातून आलेल्या आणि महाराष्ट्राच्या इतर भागात राहणाऱ्या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करता येणार नाही, त्यांची कलेक्टरकडून वाहतुकीची वेगळीव्यवस्था केली जाईल, अशीही माहिती आता समोर येत आहे. इतर राज्ये किंवा राज्यातील जिल्ह्यांशी कनेक्टिंग फ्लाइटचा ते वापर करू शकतात. मात्र दुबईहून आलेल्या प्रवाशांबाबत संबंधित विमानतळाला माहिती देण्याची जबाबदारी विमानतळ प्राधिकरणाची असणार असल्याचंही BMC कडून म्हटलं आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनचे वाढते रुग्ण आणि आगामी सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आपल्या अलीकडील आदेशात, राज्य सरकारने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments