आपलं शहरबीएमसीमंत्रालयराजकारणहेल्थ

Mumbai Corona News : आदित्य ठाकरेंचे नवे आदेश, मुंबईत कोरोना नियम कठोर होणार

पार्ट्यांवर बंदी, हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईत वाढती रूग्नसंख्या लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती वाढली आहे.हि बाब गांभीर्याने घेता, पार्ट्यांवर बंदी घालून हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री आणि उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे निदेश आहेत की  “वेळ पडल्यास अशी हॉटेल्स सील केली जावीत, जिथे जास्त नियम उल्लंघन होण्याचे खूप शक्यता आहेत.” ( Mumbai Corona News: Aditya Thackeray’s new order, Corona rules will be strict in Mumbai )

आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनासोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत महापौर किशोरी पेडणेकर , उपमहापौर सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव , पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते. हि रुग्णवाढ तिसरी लाटही असण्याची शक्यता आहे म्हणून सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे. लसीकरण लवकरात लवकर करण्याचे आवाहन या बैठकीत केले गेले आहे. या स्थितीमुळे पॅनिक होण्याची गरज नसली तरी वेगाने वाढणारी रुग्णसंख्या पाहता काळजी घेणे अनिवार्यच असल्याचेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

 

3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षीय मुलांचे लसीकरण करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून केले जाणार आहेत.पालिका हद्दीतील शाळा – कॉलेज परिसरात हे लसीकरण पार पाडणार आहेत. ‘शाळा बंद करायचे की नाही ‘ परिस्थितीचा आढावा घेऊन पुढच्या बैठकीत यावर निर्णयसह चर्चा करण्यात येणार आहे.

संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना येण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी व सात दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. शिवाय हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित प्रवाशांसाठी बीकेसी आणि नेस्को कोविड केंद्रात स्वतंत्र निःशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येकी 500 बेड तैनात ठेवण्यात येतील. शिवाय मालाड आणि कांजूरमार्ग कोविड केंद्र तत्काळ कार्यान्वित करण्यातचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज पालिका प्रशासनाला दिले.

हे हि वाचा :

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments