
राज्यात ओमायक्रोनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. “कोरोनाने पुन्हा झपाट्याने वाढायला सुरुवात केली की काय? अशी भीती पुन्हा राज्यामध्ये दिसू लागली आहे. दरदिवशी कोरोना रुग्णात 18%ने वाढ नोंदवण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण कॅबिनेटमध्येही पसरले आहे. गुरुवारी मुंबईत एकूण 1,179 नव्या रुग्णांची नोंद झाली.
(Mumbai Corona News: Restrictions to be imposed in Mumbai from today, what will happen if rules are broken …)
23 डिसेंबरच्या रात्री सुमारे 10 वाजता मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती. बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याविषयावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत तिसऱ्या लाटेच्या अंदाजामुळे नव्या नियमावलीची आणि लॉकडाऊन विषयक चर्चा करण्यात आली.वाढता कोरोना आणि राज्यात वाढत असलेले ओमायक्रोनचे रुग्ण याचा विचार करून राज्यात आज निर्बंध लावले जाऊ शकतात. तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाले की , ” जर कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला शाळा आणि महाविद्यालयांबाबत चर्चा करून ते बंद करावे लागतील .”
हे हि वाचा :