Uncategorizedआपलं शहर

Mumbai corona vaccination : मुंबईत लासिकरणासाठी ‘नाईट शिफ्ट!’

बृहन्मुंबई महानगपालिकेने रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे.

मुंबईत लसीकरणाने वेग धारण केले आहे. बृहन्मुंबई महानगपालिकेने रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. काही ठिकाणी लसीकरण रात्री उशिरापर्यंत चालण्याचीही शक्यता आहे . या उपक्रमाची सुरुवात मुंबईतील प्रभाग क्रमांक 5 पासून होणार आहे .या नवउपक्रमाचा उद्देश म्हणजेच 18 वर्षापुढील जनतेचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे.दुसरा डोस बाकी नसलेल्या 20 टक्के लाभार्थ्यांसह मुंबईचे लसीकरण जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. (Mumbai corona vaccination: Night shift for Mumbai Corona Vaccination )

मुंबईत 16 जानेवारी रोजी लसीकरण झाल्यापासून सद्यस्थितीत पालिका,राज्य सरकार आणि खासगी मिळून 451 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये 12 डिसेंबरपर्यंत 1,70,53,029 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र असलेल्या सुमारे 94 लाख जणांचा पहिला डोस घेऊन पूर्ण झाला आहे, तर 80 टक्के जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. असे असले तरी कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोन धोक्याच्या पाश्र्वभूमीवर वेगाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे.

 

हे हि वाचा :

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments