आपलं शहरखूप काहीफेमसबीएमसीमंत्रालयराजकारणविद्यापीठ

Mumbai New Year : पार्टी करणाऱ्यांना सूट, एन्जॉय करा, पण जरा बचके…

5 पेक्षा जास्त लोक रात्री एकत्र फिरू शकत नाही, तर पोलिसांसहित जवळपास 50 स्पेशल टीम अशा गर्दी करणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहेत.

नवीन वर्षाचे आगमन अगदी काहीच दिवसाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले आहे. नवं वर्ष येत आहे तर पार्ट्या तर होणारच, अशा गोष्टी म्हणणाऱ्या मंडळींना शासनाकडून एकच सांगण आलं आहे,”पार्टी करत आहात तर सावधान! तुमची महागडी पार्टी पडू शकते तुम्हाला त्यापेक्षाही महागात.” ( Mumbai New Year: Discount party, enjoy, but just a little bit …)

हल्ली मुंबई आणि ठाणेसारखे शहरसुध्दा गोवा, महाबळेश्वर आणि माथेरानसारखे नवं वर्ष आगमनाखातीर देशभरातील नागरिकांसाठी पार्टीचे एक पहिली पसंदीचे स्थळ झाले आहेत. पण यावर्षी राज्य शासनाने निर्बंध अजून शिथिल केलेले आहेत.

ठाणे जिल्ह्धिकारी यांनीही रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लावली आहे. यात 5 पेक्षा जास्त लोक रात्री एकत्र फिरू शकत नाही, तर पोलिसांसहित जवळपास 50 स्पेशल टीम अशा गर्दी करणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात या टीम फिरणार असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या 50 टीम तयार केल्या आहेत, खासकरून ठाण्यातील ग्रामीण  भागात अशा प्रकारे गर्दी करणाऱ्या पार्ट्या होऊ शकतात, त्यामुळे अशा भागांकडे म्हणजेच पिकनिक पॉईंट व धाब्यांवर या टीम फिरकणार आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वाढत्या कोरोनामुळे अनेक निर्बंध सर्वीकडेच लावण्यात आलेत, परंतु मुंबईमध्ये मात्र हे निर्बंध कडक करण्यात आलेत, त्यामुळे पार्टीकरणाऱ्या  कंपनीने आपला मोर्चा ठाण्यातील ग्रामीण भागाकडे वळवला आहे. तुम्हीही असेच ठरवले असेल तर जरा थांबा.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments