अर्थकारणआपलं शहरफेमस

Mumbai Petrol Price : पेट्रोलच्या वाढत्या दराची गाडी पुन्हा पटरीवर; सर्वसामान्यांना दिलासा…

राष्ट्रीय स्तरावर दिवाळीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताच बदल नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत एक आनंदाची बातमी आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रासलेल्या जनतेला गेल्या महिनाभरापासून दिलासा मिळत आहे. रविवारी म्हणजेच 12 डिसेंबर रोजीही तेल कंपन्यांनी वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय स्तरावर दिवाळीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.(Mumbai Petrol Price: Rising petrol prices get back on track; Consolation to all…)

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पंपावर रविवारी (12 डिसेंबर) पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी डिझेलचा दरही 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

चार प्रमुख महानगरांबद्दल (दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई) बोलायचे झाले तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये तर डिझेल 94 रुपये प्रतिलिटर आहे. व्हॅट आणि मालवाहतुकीच्या दरांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात.

देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती :

शहर             पेट्रोल           डिझेल

दिल्ली           95.41       86.67

मुंबई             109.98    94.14

कोलकाता   104.67    89.79

चेन्नई           101.40    91.43

 

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments