Uncategorized

Omicron in Mumbai : वाढत्या ओमिक्रोन’मुळे मुंबई पालिकेची नवी नियमावली जाहीर

16 ते 60 वयोगटातील अनेकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्णाण झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोनानंतर आता ओमिक्रोनचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. 16 ते 60 वयोगटातील अनेकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्णाण झाले आहे.(Omicron in Mumbai : Mumbai Municipal Corporation announces new rules due to rising Omicron)

ओमिक्रोनच्या या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने नागरिकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सोबतच सर्वांनी मास्क घालणे आवश्यक असून नवीन नियम पाळण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आलय. पालिकेने सर्व चित्रपटगृह, हॉटेल्स व रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल यांनांही याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन पालिकेकडून केलं आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या नवीन नियायमनुसार

खुल्या जागेवर 50 टक्के लोकांची उपस्थितीला परवानगी. बंदिस्त जागेत 25 टक्के लोकांची उपस्थितीला परवानगी. 1000 पर्यंत लोक क्षमता असलेल्या पूर्वनियोजित सभा व कार्यक्रम यांना अगोदर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक.

मास्कचा योग्य वापर आणि पूर्ण लसीकरण घेणे आवश्यक आहे. ओमिक्रोन अत्यंत जलद वेगाने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. सरकार आणि प्रशासनाकडून तिसरी लाट येऊ नये म्हणून वारंवार नियम जाहीर करूनसुद्धा विशेषतः लग्न समारंभात या नियमांचे उल्लंघन होतो असल्याची खंत मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

ज्यांच्याकडून या नियमांचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर महानगर पालिकेच्या प्रशासनाची आणि पोलिसांची संयुक्त कारवाई केली जाईल, असेही पालिका आयुक्त म्हणाले. सध्या नागरिकांच्या सहकार्य आणि वेगाने होणारे लसीकरण व प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती चहल यांनी दिली. अनेक देशात ओमिक्रोनच्या या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आहे. भारतात अशी परस्थिती निर्माण होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

बॉलिवूड मधील काही कलाकारांना पार्टीत वावर असल्यामुळे कोरोनाची लागण झाली असून चहल म्हणाले की ज्या व्यक्तींचा समाजावर प्रभाव आहे, अशा व्यक्तीने कोरोना संदर्भात विषेश खबरदारी घेतली पाहिजे. 27 नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून मुंबई पोलिस यांच्या सुचनेनुसार नियमांचे उल्लंघन करणऱ्यांवर IPC आणि साथीचा रोग कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा आदेश मुंबई पोलिसांनी दिला आहे.

आता येणाऱ्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने समारंभ आणि कार्यक्रम आयोजित केल्यास कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढू शकतो. लग्न आणि इतर समारंभांमध्ये वाढणारी गर्दी रोखण्याची गरज आहे. शिवाय, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर सार्वजनिक आस्थापने देखील कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर येत आहे.

चहल यांनी नागरिकांना शक्य तितक्या लवकर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्यास सांगितले असून सार्वजनिक ठिकाणी किंवा आस्थापनांवर काम करणारे कर्मचारी तसेच कार्यक्रम, समारंभात उपस्थित असलेले कर्मचारी पूर्णत: लसीकरण न केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा ही त्यांनी दिला.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments