आपलं शहरखूप काहीफेमस

Rahul Kadu : इंजिनिअरींग सोडली आणि विकतोय अप्पे, मराठी तरुणाचा भन्नाट व्यवसाय

मेहनतीच्या जिवावर ट्रेनी ते मॅनेजर असा प्रवास करूनही लॉकडाऊनमध्ये नोकरीला मुकावं लागलं होतं.

महाराष्ट्रात कोरोना आल्यापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याचे अनेक परिणाम आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. मात्र या लॉकडाऊनच्या काळात एक पॉझिटीव्ह गोष्ट समोर येत आहे. 2014 साली इंजिनिअर झालेल्या राहूल कडू या तरुणाचीही नोकरी याच लॉकडाऊनमध्ये गेली होती. मेहनतीच्या जिवावर ट्रेनी ते मॅनेजर असा प्रवास करूनही लॉकडाऊनमध्ये नोकरीला मुकावं लागलं होतं. मात्र नोकरी जाऊनही काहीतरी वेगळं करता येऊ शकतं, ही जिद्द राहुलसाठी महत्त्वाची ठरली.

(Rahul Kadu : Leaving Engineering and Selling Appe, Abandoned Business of Marathi Youth)

राहुलच्या डोक्यात कल्पना आल्यानंतर त्याने सुरुवातीला लोवर परेलमधील मोनो स्टेशनच्या खाली छोटासा स्टॉल सुरु केला, या स्टॉलवर त्याने अप्पे विकायला सुरवात केली. स्वतःमध्ये इंजिनिअरिंगची आवड असल्याने त्याने आपल्या व्यवसायालादेखील ‘इंजिनिअरस् अप्पे’ असं नाव दिलं आहे.

पहिल्या दिवशी फक्त करून पाहू, या उद्देशाने सुरु केलेला व्यवसाय आता खुप चांगला सुरु आहे. पहिल्या दिवशी फक्त दीड किलो अप्पे विकले गेले होते, असं राहुलने आम्हाला सांगितले मात्र आता त्याच जागेला रोज सकाळी 10 वाजेपर्यंत तब्बल 5 किलो अप्पे विकले जातात, अशी माहिती राहुलने दिली.

राहुलला आता हाच व्यवसाय मोठ्या पातळीवर सुरु करायचा आहे. एका फुटपाथवर सुरु असलेल्या या व्यवसाला त्या एका जागी अधिकृतरित्या स्थिर करायची आहे. या उद्योगाला खूप मोठं करायचं स्वप्न राहुलचं आहे. मराठी तरुण स्वतः मेहनत करून पुढे आले पाहिजेत, तरच आपण व्यवसायात पुढे जाऊ शकतो, असं राहुल आज अनेक तरुणांना मॅसेज देत असतो.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments