क्राईम

Nirav Modi : नीरव मोदीच्या रिदम हाऊसचा लिलाव होणार, 1,000 कोटीमध्ये होता या इमारतीचा समावेश

रिदम हाऊस म्युझिक स्टोअर असलेली इमारत, नेपन्सी रोड फ्लॅट, कुर्ला येथील कार्यालयीन इमारत आणि हिरे व्यापारी नीरव मोदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

Nirav Modi : ED ने नीरव मोदीची 1,000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती, काळा घोडा परिसरात रिदम हाऊस म्युझिक स्टोअर असलेली इमारत, नेपन्सी रोड फ्लॅट, कुर्ला येथील कार्यालयीन इमारत आणि हिरे व्यापारी नीरव मोदीच्या दागिन्यांचा समावेश यामध्ये होता. पंजाब नॅशनल बँकेची (PNB) थकबाकी वसूल करण्यासाठी आता यातील काही इमारतींचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Rhythm House among Rs 1,000 crore Nirav Modi assets to be auctioned)

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने निरव मोदीच्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी लिक्विडेटरची नियुक्ती केली आहे. ईडीने यापैकी काही मालमत्ता आधीच जप्त केल्यात आणि काहींचा लिलावदेखील करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पाचादेखील यामध्ये समावेश होता.

नीरव मोदीच्या मालकीच्या कार, पेंटिंग्ज आणि इतर महागड्या वस्तूंचा लिलाव केल्यानंतर एजन्सीने पीएनबीला सुमारे 6 कोटी रुपये सुपूर्द केले आहेत. ज्यांनी फसव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग द्वारे 6,500 कोटी रुपयांचे पीएनबी बँकेचे कर्ज डिफॉल्ट केले होते ते आता जप्त करण्याचे काम ED ने सुरु केले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात 2,600 कोटी रुपयांच्या मालमत्तेची चौकशी सुरु आहे. सध्या निरव मोदी लंडनमधील तुरुंगात बंद आहे, त्याला भारताकडे प्रत्यार्पणाची प्रोसेस सुरु आहे.

मोदीच्या काही मालमत्ता ज्या बँकेकडे गहाण ठेवल्या नाहीत, त्या मालमत्तादेखील ताब्यात घेण्याची प्रोसेर इडीने सुरु केली आहे. वरळीतील 100 कोटी रुपयांची इमारत, अलिबागचा बंगला आणि जैसलमेरमधील पवनचक्की ईडीच्या ताब्यात आली आहे. तपास यंत्रणेला त्याच्या अमेरिकेसह परदेशातील मालमत्तांचा ताबा अद्याप मिळू शकलेला नाही.

मोदीने PNB बँकेकडून फसवणूक केलेल्या पैशातून यापैकी अनेक मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये त्याने रिदम हाऊसची प्रसिद्ध इमारत विकत घेतली होती. त्याची कंपनी फायरस्टार डायमंड त्याच्या मालकांकडून, कर्माली कुटुंबाकडून, रु. 32 कोटीदेखील जप्त केले आहेत. हेरिटेज मालमत्तेचे उच्च श्रेणीतील दागिन्यांच्या शोरूममध्ये रूपांतर करण्याचा प्लॅन मोदीचा होता.

2018 मध्ये, मोदी आपल्या कुटुंबासह देशातून पळून गेल्यावर, ईडीने रिदम हाऊसची इमारत इतर मालमत्तांसह जप्त केली होती. नंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आयकॉनिक म्युझिक स्टोअर वाचवण्यासाठी क्राउडफंडिंगचा प्रस्ताव दिला होता. लिलाव प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. बीएमसी हेरिटेज कमिटीनेही संगीताच्या जाहिरातीसह सार्वजनिक कारणांसाठी रचना घेण्यासाठी चर्चा केली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments