खूप काही

School Update : पालिकेचा निर्णय फसला, पालक जिंकले, या तारखेला सुरू होणार सर्व शाळा

मुंबईसह राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

School Update : आता कुठे कोरोनाचा धोका कमी होत असतानाच पुन्हा कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने भारतासह जगभरात चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराची भीती जगभर पसरत आहे. हा विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे व आतापर्यंत 16 देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणू पसरला आहे.(Municipal decision failed, parents won, all schools will start on this date)

या नवीन विषाणूचा धोका लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने मुंबईसह राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. ज्या अंतर्गत मुंबईत 1 डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार होते,परंतु आता मुंबईतील शाळा 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरला सुरू होणार आहेत.

BMC ने आता जगभरातील कोरोनाचे Omicron प्रकार पाहता 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून इयत्ता 1 ते 7 वीच्या वर्गांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सांगितले की, ‘राज्य मंत्रिपरिषद आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र नुकताच दक्षिण आफ्रिकेत धोकादायक कोरोना विषाणू समोर आला आहे. ओमिक्रॉन विषाणूमुळे भारतासह जगभरात पुन्हा चिंता वाढली आहे.

यापूर्वी त्यांनी ट्विट केले होते की, ‘राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री परिषद आणि बालरोगविषयक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होतील. असा निर्णय घेण्यात आला होता शाळांच्या सुरक्षित पुनर्स्थापनेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

विशेष म्हणजे, BMC ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांत आफ्रिकेतून 1000 प्रवासी मुंबईत परतले आहेत. त्यानंतर ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक आहे. या सर्व प्रवाशांचा BMC कडून शोध सुरू आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments