अर्थकारण

Tata Power चा शेअर धमका करणार, टाटांची मोठी इन्व्हेस्टमेंट

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुंळे त्याला पर्याय म्हणून अनेक आयडिया बाजारात येत आहेत.

Tata Power : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुंळे त्याला पर्याय म्हणून अनेक आयडिया बाजारात येत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहन समोर येत आहे. भारतातही इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढवण्यासाठी सरकार लोकांना प्रोत्साहन करत आहे आणि खरेदीदारांना अनेक फायदे देत आहे. अशा परिस्थितीत, केवळ भारतच नाही तर जगातील आघाडीच्या कार निर्मात्या कंपन्याही देशात इलेक्ट्रिक वाहनांचे विविध ऑफर देत आहेत. त्यातलीच एक कंपनी म्हणजे Tata Power.

2025 पर्यंत 10,000 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे लक्ष्य

आता जेव्हा देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल, तेव्हा अर्थातच त्यांना चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनचीही गरज भासेल. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आणि भविष्यातील त्यांच्या गरजा लक्षात घेऊन, टाटा पॉवर देशाच्या कानाकोपऱ्यात चार्जिंग स्टेशनची संख्या वेगाने वाढवत आहे. टाटा पॉवरचे एमडी आणि सीईओ प्रवीर सिन्हा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना कंपनीच्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, टाटा पॉवरने 2025 पर्यंत देशभरात 10,000 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

टाटा पॉवरने अलीकडेच देशातील 180 शहरांमध्ये 1000 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. शहरातील मॉल्स, हॉटेल्स, कार्यालये, रिटेल स्टोअर्स, सार्वजनिक ठिकाणी ही चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात आली आहेत. टाटा पॉवरने सर्वप्रथम मुंबईत ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास सुरुवात केली, त्यानंतर आता 180 शहरांमध्ये टाटा पॉवरची चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात आली असून येत्या काही दिवसांत ही संख्या नक्कीच वाढेल. टाटा पॉवरच्या नियोजनानुसार, देशातील प्रमुख महामार्ग, द्रुतगती मार्गांवर चार्जिंग स्टेशन देखील बसवले जातील जेणेकरून लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

वीज पुरवठ्याकडेही कंपनीचे पूर्ण लक्ष आहे.

प्रवीर सिन्हा म्हणाले की, टाटा पॉवर होम चार्जिंगसाठी तसेच सार्वजनिक चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारत आहे. याशिवाय शहर बससेवा देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींसाठी चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येत आहेत. अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल, टाटा पॉवर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ईव्ही चार्जिंग स्टेशन बांधणार आहे. टाटा पॉवर केवळ चार्जिंग स्टेशन उभारण्यावरच नव्हे तर पुरेशा वीज पुरवठ्यावरही पूर्ण लक्ष देत आहे.

कुठल्या कंपन्या बनवत आहेत चार्जिंगच्या कार्स

Tata Motors
Olectra Greentech
JBM Auto
Ashok Leyland
SML Isuzu
Eicher Motors
M&M

कुठल्या कंपन्या बनवत आहेत EV चार्जिंग स्टेशन

Inc. (NYSE: CHPT)
Blink Charging Company (NASDAQ: BLNK)
Volta Inc. (NYSE: VLTA)
EVgo Inc. (NASDAQ: EVGO)
Wallbox (NYSE: WBX)

वर दिलेल्या संपूर्ण माहितीनुसार टाटा कंपनी ही इलेक्ट्रिक गाडी तयार करण्यापासून ते त्यांना चार्जिंग पुरवठा करण्यापर्यंतच्या सर्व सुविधा पुरवणार आहे, त्यामुळे येत्या काळाता tata power, tata motars आणि संबंधित कंपण्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments