घटना

मुंबईत कलम 144 लागू करण्याचं नेमकं कारण आलं समोर, पोलीस म्हणतात…

मुंबई शहरामध्ये १२ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू असणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वाढत्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई शहरामध्ये १२ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू असणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वाढत्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १७ वर गेली आहे. लागू केलेल्या कलमानुसार 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे १७ रुग्ण

महाराष्ट्रात आंतराष्ट्रीय विमान उड्डाणांवर काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याआधीच अनेकजण परराष्ट्रातून महाराष्ट्रातील अनेक शहरामध्ये आले आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरु असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तर मुंबईतील विमानतळावरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला RTPCR ची चाचणी करणे बंधनकारक असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

एमआयएमचा तिरंगा मोर्चा

मुंबईमध्ये कलम १४४ जरी लागू केला असला तरी यामध्येच आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एमआयएमकडून आपल्या काही मागण्यांसाठी राज्यभर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यभरातील अनेक मुस्लिम बांधव मुंबईमध्ये येणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील करत आहेत. मुस्लीम आरक्षणासाठी आणि वक्फ मंडळाला विशेष पॅकेज मंडळांना मिळावेत, या मागणीसाठी मुंबईत एमआयएमकडून तिरंगा मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र या मोर्चाने ओमिक्रॉनच्या कारणाने परवानगी दिली नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments