बीएमसी

Mumbai Corona update : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात, महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वाढला

शुक्रवारपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.

Mumbai Corona update : शुक्रवारपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणीही गर्दी करता येणार नाही. त्यासोबतच लग्न, इतर कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. (Mumbai News Live Updates: Active Covid-19 cases rise in city, Maharashtra)

हे सगळं करण्यामागे एकच उद्दिष्ट्य आहे, ते म्हणजे महाराष्ट्रात वाढत चाललेली कोरोना रुग्ण संख्या आणि त्यापाठोपाठ ओमिक्रॉन रुग्णांचीही संख्या वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात 110 हून अधिक रुग्ण आहेत. तर कोरोनाचे रुग्ण दिवसाला 1000 हून अधिक समोर येत आहेत. देशपातळीवरही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशामध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय देशातील अनेक राज्यांमध्ये घेण्यात आला आहे. राज्यात होणारे लगीन, समारंभ, इतर कार्यक्रम, सार्वजनिक समारंभांवर निर्बंध लादण्यात आले आहे. लग्नामध्ये बंद हॉलमध्ये 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे तर मोकळ्या जागेत लग्न होत असेल तर एकूण जागेच्या 25 टक्के किंवा एकूण 250 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

एकाच लॅबमधील 12 जणांना कोरोना

दादरमध्ये असलेल्या लालपाथ पॅथॉलॉजी लॅबला बंद करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. तिथल्या 12 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे , त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनाही कोरोनाची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. 22 डिसेंबर रोजी एकाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बीएमसीच्या जी-नॉर्थ वॉर्डने डॉ. लाल पॅथलॅबला सील केले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरून असे दिसून आले की त्याच्या संपर्कातील 12 जण, पॅथलॅबमधील सर्व सहकारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments