घटना

मुंबईचे तापमान १५ अंशांच्या खाली, कधी पाऊस, कधी थंडी तर कधी उनाचा कडाका; असं का?

काही दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली होती, मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरुच आहे.

काही दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली होती, मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरुच आहे. दुसरीकडे राज्यात थंडीचा जोरदेखील कायम आहे, या सगळ्यादरम्यान आणकी एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा थंडी वाढू शकते. अशी माहिती समोर येत आहे.

ऑक्टोबरपासून साधारण थंडीला सुरुवात होते, मात्र याचदरम्यान मुसळधार पावसानेदेखील हजेरी लावली आहे. ऑक्टोबरसह नोव्हेंबरमध्येही राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडल्याचं चित्र होतं. राज्यातल्या अनेक ठिकाणी तापमान १५ अंशसेल्सिअसच्या खाली तापमान असल्याचं पाहायला मिळालं. अनेक शहरं सकाळी धूक्यांमध्ये हरवली होती. आज पहाटेपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळालं.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील किमान सरासरी तापमान खालवल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबईमधील तापमानही २ अंश सेल्सिअसने कमी झालं आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचं हवामान विभागाचे अधिकारी सांगत आहेत. इतकच नाही तर मुंबईसह कोकणात पुन्हा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ सोडून उर्वरित भागातील किमान तापमानात वाढ होऊ शकते, मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील तापमान पुन्हा गारठण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शहरातील तापमान हे १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल अंदाज आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments