आपलं शहर

Thirty First News: ‘1 जानेवारीला नववर्ष साजरे करू नका’, हिंदू जनजागृतीच्या प्रचाराला सुरुवात…

हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे.

मागील 2 वर्षात हाह:कार माजवणाऱ्या कोरोनाच्या संकटाला आळा घालण्यासाठी शासन खूप प्रयत्न करत आहे. जरी कोरोनाच्या डेल्टा विषाणूवर आपण णात करत असलो, तरीही नुकताच समोर येत असलेला ‘ओमिक्रोन’ कुठेतरी वाढताना दिसत आहे. (Thirty First News: ‘Don’t celebrate New Year on January 1’, Hindu Janajagruti campaign begins)

31 डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या पार्ट्यांमुळे शासनाने कडक निर्बंधही लावले आहेत. ख्रिस्ती नववर्षामुळे उत्साहाच्या नादात गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळी जाऊन मद्यपान आणि धूम्रपान, पार्टी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि त्यादरम्यान घडणारे अपप्रकार थांबवण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनिधींनी मुंबईच्या विविध भागांतील पोलीस ठाण्यात तसेच शाळा आणि ट्यूशन क्लासेसमध्ये निवेदन पाठवले आहे. हिंदू बांधवांनी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे; हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि नवी मुंबई भागात गेल्या 2 आठवड्यात विविध ठिकाणी व्याख्याने घेऊन आणि साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांतून करण्यात आले.

तसेच फलक प्रसिद्धी, सोशल मीडिया आदि माध्यमातूनही प्रबोधन करण्यात आले. 1 जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘1 जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा गैरसमज निर्माण झाला आहे; भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि फायदेशीर आहे. प्रतिवर्षी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 31 डिसेंबरच्या निमित्ताने ‘संस्कृतीरक्षण मोहीम’ राबवण्यात येते.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments