क्राईमघटना

Vasai – Nalasopara : चोरीच्या आरोपात दोन सख्खे भाऊ आणि एका अल्पवयीन मुलाला अटक !

पोलीस या चोरांचा शोध घेताना CCTV च्या आणि इतर माहितीच्या आधारे या वाहन चोरांना नालासोपारा परिसरातून अटक करण्यात आली

एका पीडित व्यक्तीने 29 नोव्हेंबर पोलीस स्टेशनमध्ये त्याचे वाहन वसई विभागात काही अनोळखी व्यक्तींनी चोरले आहे अशी तक्रार केली. (Vasai – Nalasopara: Two brothers and a minor arrested for theft)

तक्रारीची दखल घेत नालासोपारा पोलिसांनी कारवाहीस सुरुवात केली असता. “पोलीस या चोरांचा शोध घेताना CCTV च्या आणि इतर माहितीच्या आधारे या वाहन चोरांना नालासोपारा परिसरातून अटक करण्यात आली.” अशी माहिती पेल्हार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.

29 नोव्हेंबरला तक्रार दाखल झाल्यानंतर मंगळवार 23 डिसेंबर रोजी या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात चार आरोपींना अटक आली असून विशेष बाब म्हणजे दोन आरोपी हे सख्खे भाऊ असून एक अल्पवयीन मुलाचा ही त्यात समावेश आहे.

या आरोपींचा इतर अन्य गुन्ह्यात सहभाग आहे का याचा शोध याचा पोलीस घेत असून या अटकेत चोरीच्या दोन कर, दोन ऑटो रिक्षा आणि आठ मोटरसायकल ही जप्त केल्या आहेत.

 

हे हि वाचा:

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments