Uncategorized

10 वर्षीय मुलीने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत केली सायकलने सफर! 

दहा वर्षीय सईने 38 दिवसात काश्मीर ते कन्याकुमारी 3 हजार 600 किमीचा प्रवास चक्क सायकलने पूर्ण केला आहे.

कोरोना संसर्गामुळे शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे अनेक मुलांकडे खूप मोकळा वेळ उरत आहे. त्यामुळे मुलं या वेळेचा खूप सदुपयोग करताना दिसत आहेत. त्याचच उदाहरण म्हणजे ठाण्यातील बाळकुम गावामधील सई पाटील. दहा वर्षीय सईने 38 दिवसात काश्मीर ते कन्याकुमारी 3 हजार 600 किमीचा प्रवास चक्क सायकलने पूर्ण केला आहे. ( 10 year old girl cycled from Kashmir to Kanyakumari! )

सईने महाराष्ट्रात ही या आधी सायकलने प्रवास केला आहे. सईला सायकल चालवण्या व्यतिरिक्त पोहण्याची सुद्धा आवड आहे. पोहण्यात ही सईने काही विक्रम केले आहेत. सईने काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास करण्यासाठी लॉकडाऊन मध्ये सराव केला होता. सई रोज ५० किमीचा प्रवास सराव म्हणून करत होती. रोज ५० किमी सायकल चालवल्यावर विशिष्ट प्रकारच्या आहाराची गरज तिला होती त्या आहाराची काळजी घेण्याचे काम सईच्या आईने केले.

तीचे वडील आशिष पाटील म्हणाले, सई तिच्या ध्येयासाठी समर्पित आहे आणि दिनचर्या उत्तम प्रकारे पाळते. सई श्रीमा विद्यालयाची विद्यार्थिनी आहे, तीने या प्रवासाचे उद्दिष्ट ठेवले आणि एक वर्षाहून अधिक काळ सराव केला, त्याच बरोबर शाळेचा गृहपाठ आणि इतर उपक्रम पूर्ण केले. मागच्या वर्षीही ती एकटीच लडाखला गेली होती.

सईच्या वडिलांनी नेहमी सईला प्रोत्साहित केले. या वेळी सई सोबत काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवासात सईच्या वडिलांनी तिला साथ दिली. काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करण्यास सईला 38 दिवस लागले, रोज सई व सईचे वडील 120 किमीचा टप्पा पूर्ण करत होते. सईने तीच  प्रवास 16 डिसेंबर 2021 रोजी सुरू करून 20 जानेवारी 2022 रोजी पूर्ण केला.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments