मंत्रालय

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीतील 5 मोठे निर्णय; मुंबईकरांसाठी गूड न्यूज

कोरोनामुळे शाळा परत बंद आहेत. तर फक्त दहावी व बारावीच्या शाळा सुरू आहेत. तर या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक ही शालेय बस ने होत असते.

Cabinet Meeting : गुरुवारी, 13 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले गेले. यामध्ये प्रामुख्याने शालेय बस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी, मुंबईतील पाचशे आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता करमाफी, वैद्यकीय व शासकीय महाविद्यालयातील अध्यापक पदांच्या निर्मितीस मान्याता, महीला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी 3 टक्के निधी, रात्रीच्या गौण खनीजाच्या उत्खननाला परवानगी देणे, अशा मुद्यांवर चर्चा करण्यात आणि त्या मुद्द्यांना संमंती देण्यात आली.

कोरोनामुळे शाळा परत बंद आहेत. तर फक्त दहावी व बारावीच्या शाळा सुरू आहेत. तर या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक ही शालेय बस ने होत असते. यामध्ये काही खासगी बसचा समावेश असतो, तर काही कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या बस असतात. या वाहतूकदारांचा कर माफ करण्याचा निर्णय या सभेत घेतला आहे. हा कर एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीपर्यंतचा आहे. तसेच ज्यांनी हा कर भरला आहे त्यांचा कर पुढील काळात समायोजित केला जाणार आहे.

मुंबईतील 500 चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णयही या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे. शासनाच्या या सवलतीमुळे शासनाचा एकूण 462 कोटींचा महसूल कमी होणार आहे.

नागपूर, पुणे व अकोला येथील महाविद्यालयांमध्ये सध्याच्या पदांमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 9 पदांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच शासकीय महाविद्यालयात ही 9 पदांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये 1 प्राध्यापक, 3 सहयोगी प्राध्यापक व 5 सहाय्यक प्राध्यापक या पदांचा समावेश आहे.

शासनाने रात्री ही गौण खनिजाच्या उत्खननाची व त्याच्या वाहतुकीची परवानगी देण्याचा निर्णय केला आहे. ही परवानगी शासनाच्या पायाभूत अथवा जलसंपदा प्रकल्पांच्या कामांसाठी गरज पडल्यास लागू होईल.

तसेच महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी ही 3 टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत महिला व बालसशक्तीकरण विभागाला दरवर्षी 450 कोटी एवढा निधी मिळणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments