खूप काही

आईचं दुसरं लग्न लावून दिल्यानंतर मुलांच्या भन्नाट प्रतिक्रिया

पतीच्या व्यसनामुळे आणि कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून त्यांनी 2012 साली घटस्फोट घेतला.

ही गोष्ट आहे मुंबईतली. जिथे मुलांनी स्वतःच्या आईचे म्हणजेच सोनी सोमाणी यांचे लग्न लावून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करून दिली आहे. (Abandoned reaction of children after mother’s remarriage)

मुलांनीच आईचे लग्न लावून दिल्यामुळे यावरती नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरूवात केलीये. मुलांनी आईचे दुसरे लग्न लावले परंतु सोनी सोमाणी या मूळच्या राजस्थानच्या असून त्यांचे पहिले लग्न वयाच्या सतराव्या वर्षी झाले होते. पतीच्या व्यसनामुळे आणि कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून त्यांनी 2012 साली घटस्फोट घेतला. नातेवाईकांचा कोणताही आधार न घेता त्यांनी स्वतःच्या आयुष्यास सुरूवात केली.

‘मी एका अशा समजात राहत आहे, जिथे मला आधार तर नाहीच मिळाला परंतु त्याच एका व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचा आग्रह करण्यात आला. परंतू प्रत्येक व्यक्तीला योग्य निवड करण्याचा हक्क असल्यामुळे प्रत्येकाने चांगले आयुष्य जगले पाहिजे.’ असे सोनी सोमाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

BBC Marathi वाहिनीशी संवाद साधताना सोनी सोमानी यांच्या मुलीने, नेटकऱ्यांनी स्वतःच्या जीवनात काय चालले आहे, ते पहावे, असे सांगत जशी आई आपल्या मुलांचे लग्न लावते, तसच मी माझ्या आईच्या लग्नाचा आनंद घेतला, आजपर्यंत आम्ही तिघे अनेक प्रसंगांतून या चांगल्या क्षणांपर्यंत पोहचलो आहोत. मुलगा समीर सोमाणी यानेही आईने नवीन जीवनास सुरूवात केली याचा मला आनंद आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

हे हि वाचा:

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments