मंत्रालय

आदित्य ठाकरे ‘रायगड’वर राहणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील सर्व पाट्या हिंदी, कन्नड, इंग्रजी किंवा इतर भाषेमधून न लावता, ती मराठीमध्ये लावावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Aditya Thackeray : राज्य सरकारने नववर्षात दोन महत्त्वाची कामं केली आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्रातील सर्व पाट्या हिंदी, कन्नड, इंग्रजी किंवा इतर भाषेमधून न लावता, ती मराठीमध्ये लावावी, असा निर्णय राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये समंत केला, तर दुसरीकडे मंत्री महोदयांना राहण्यासाठी असलेल्या घरांचे नामकरणही केले आहे.(Aditya Thackeray to stay in Raigad)

मंत्रालयासमोरील शासकीय बंगले हे संबंधित अनेक मंत्र्यांना राहण्यासाठी दिलेले असतात. आतापर्यंत हे बंगले विशिष्ट क्रमांकाच्या मदतीने ओळखले जात असतं, मात्र राज्य सरकारने त्या बंगळ्यांचे नंबर बदलून त्या प्रत्येक बंगल्यांना विशिष्ट नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही नावं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या लक्षात घेऊन ठेवण्यात आली आहेत. ही नावं नेमकी काय आहेत आणि कोणत्या मंत्र्यांला कुठल्या नावाचा बंगला मिळाला आहे, हे आपण पाहणार आहोत.

अ ३ – शिवगड (जितेंद्र आव्हाड)
अ ४ – राजगड (दादा भुसे)
अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी)
अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे)
अ ९ – लोहगड –
बी १ – सिंहगड (विजय वड्डेटीवार)
बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)
बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)
बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)
बी ५ – विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)
बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)
बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)
क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)
क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)
क ३ – पुरंदर
क ४ – शिवालय
क ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)
क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)
क ७ – जयगडक ८ – विशाळगड

यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई शहराच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवण्यात आलं आहे.

इतकच नाही तर राज्य सरकारने अजून एक गडकिल्ल्यांच्या नावांवरून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे, ज्या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारे दारु विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जाते, अशा दुकानांना हॉटेल्सला, बार, रेस्टॉरंटला महापुरुष, आदरणीय महिला, किंवा गड किल्ल्यांची नावे देऊ नयेत, असा कायदा करण्यात येणार आहे. यासाठी अधिनियम कायदा 2017 मध्ये सुधारणा करण्यात येण्यात आल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments