कारणराजकारण

….आणि यामुळे संजय राऊतांचं झिंग झिंग झिंगाट झालं आहे

सुप्रमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयामुळे भाजपा आक्रमक झाले असून यावरून राज्य सरकारवर आरोप केले जात आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत वाईन विक्रीच्या निर्णयामुळे भाजपा आक्रमक झालं आहे. वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी नाहीतर इतरांसाठी आहे. याबाबत परदेशात बैठका झाल्या आहेत असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, वाईन तयार करणाऱ्या एका मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती बैठक कुठे झाली? विदेशात झाली का? हा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे. हा काही साधा घेतलेला निर्णय नाहीये तर याच्यामागे फार मोठं अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीने घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचं हे काही स्वप्न या सरकारचं दिसत आहे त्याचा आम्ही निषेध करतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यावरून संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच संजय राऊतांचं झिंग झिंग झिंगाट झालं आहे. असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत. अस देखील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments