
कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी नव्हती. या काळात मुंबईकरांसाठी बेस्टने प्रवास करण्याशिवाय दूसरा कोणता मार्ग नव्हता. या काळात सामान्य नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहिलेल्या चालक, वाहकांसह विद्युत, अभियंता विभागांतील शेकडो कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. २३ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमधील कोविड भत्ता अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. या बाबतीत एका बेस्ट कर्मचाऱ्याने २७ जानेवारी २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाला पत्र लिहित कोविड भत्त्याची मागणी केली आहे.
वारंवार मागणी करूनही बेस्ट कर्मचाऱ्याना भत्ता दिला गेला नाही. याआधी ही बेस्ट प्रशासनाने नोव्हेंबरमध्ये राहिलेला कोविड भत्ता मिळेल असे जाहीर केले होते. परंतु हे आश्वासन ही बेस्ट प्रशासनाला पूर्ण करता नाही आलेले आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये यासंदर्भात पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत याविषयी बैठक झाली होती. तरीही बेस्ट कर्मचाऱ्याना कोविड भत्ता मिळाला नाही, असे बेस्ट कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. अत्यावशक सेवा पुरवताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती तर अनेक कर्मचाऱ्यांना जीव ही गमवावा लागला होता. बेस्ट उपक्रमाने दररोज ३०० रुपये कोविड भत्ता देण्यास मंजुरी दिली होती. तशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. जूनपर्यंत हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर भत्ता देणे बंद झाले. वारंवार मागणी करुनही आजही कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित आहेत, असेही ते म्हणाले.
कर्मचाऱ्यांनी उपरोक्त कोविड काळात नियमित कामावरुन सेवा दिली असताना देखील भत्ता मिळत नसल्याने कामगार त्रस्त आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने जाहीर केलेल्या विभागीय परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यारी ३०० रुपये प्रतिदिन कोविड भत्ता मिळण्यास पात्र आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्याला हा भत्ता देण्यात आलेला नाही. हा भत्ता मिळावा यासाठी एका कर्मचार्याने प्रशासनाला पत्र लिहल आहे. विनंती करतो की, मी उपरोक्त काळात एकूण १३५ दिवस काम केले आहे. म्हणून, मला ४० हजार ५०० रुपये भत्ता देण्यात यावा. अस त्याच म्हणणं आहे.