आपलं शहरहेल्थ

Bhaykhala Corona News : vaccination for 15 + कोरोना सेंटरमध्ये 15 ते 18 वर्षीय मुलांच्या लसीकरणाला धमाकेदार सुरुवात

भायखळा येथील रीचर्डसन क्रूडास जम्बो कोविड सेंटरमध्ये या लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 15 ते 18 वयोगटातील 432 मुलांना लस देण्यात आली.

राज्यात 3 तारखेला 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरणाची सुरुवात झाली. भायखळा येथील रीचर्डसन क्रूडास जम्बो कोविड सेंटरमध्ये या लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 15 ते 18 वयोगटातील 432 मुलांना लस देण्यात आली. यात महानगरपालिकेच्या 67 विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.

( Bhaykhala Corona News: Vaccination for 15 + Corona Center Vaccination for 15 to 18 year olds begins with a bang )

या लसीकरण कार्यक्रमात अनेक स्थानिक नेतेमंडळी आणि समाजसेवक उपस्थित होते.स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, स्थानिक आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेविका श्रीमती सोनम जामसुतकर, श्रीमती सुरेखा लोखंडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

रीचर्डसन क्रूडास जम्बो कोविड केंद्र हे सहआयुक्त श्री . रणजीत ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली ई विभाग कार्यालयामार्फत उभारण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments