बीएमसी

BMC Announcement Today : मुंबईकरांची रस्ते सुरक्षा होणार अधिक सुरक्षित : पालिकेकडून कामाला सुरुवात

येत्या काळात लवकरात लवकर ही कामे सुरू होतील आणि याच फायदा मुंबईतील नागरिकांना होईल असं पालिकेचे म्हणणं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्याने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेतर्फे अनेक कामे हाती घेतली जात आहेत. मुंबई महानगरातील रस्त्यांवरील मध्यवर्ती दुभाजकांच्या रंगरंगोटीची कामे सर्व विभाग कार्यालयामार्फत वेगाने सुरु करण्यात आली आहेत. रस्ते सुरक्षितता वाढविण्यासाठी दुभाजकांसह पदपथांच्या कडेला असणारे दगड देखील रंगवले जात आहेत. त्यासोबत प्रमुख रस्त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या भिंतीवरही कलात्मक चित्रं रंगवून सुशोभीकरण करण्यात येत आहे. ( BMC Announcement Today : Road safety for Mumbaikars will be safer: Municipal Corporation starts work )

वाहनचालकांना सुरक्षित रितीने वाहन चालविता यावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे या दृष्टिने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीवेळी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांना सूचना केल्या.

ज्या रस्त्यांवर मध्यवर्ती दुभाजक आहेत त्यांची स्वच्छता करुन नव्याने रंगरंगोटी करणे, दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजक बांधणे, दुभाजकांमध्ये हिरवळ वा फुलझाडांची लागवड करणे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, प्रमुख रस्त्यांवरील आजुबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी करणे, चित्रं रेखाटणे इत्यादी कामे हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या महानगरात विविध भागांमध्ये ही कामे वेगाने सुरु आहेत. विभाग कार्यालयांच्या वतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या काळात लवकरात लवकर ही कामे सुरू होतील आणि याच फायदा मुंबईतील नागरिकांना होईल असं पालिकेचे म्हणणं आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments